Saturday, September 9, 2017

A marathi joke-story on demonetization

Marathi story forwarded on some whatsapp groups:

काचेवर माशी बसली होती, माशी मारण्यासाठी एका मुलाने दगड मारला , माशी तर उडून गेली, काच मात्र फुटली. एक चिलट मात्र मेले. मुलाने आणि मित्रांनी चिलट मारणे हे कसे आवश्यक होते हे तारस्वरात सांगायला सुरूवात केली. मुलाचे युक्तिवाद होते १) माझा उद्देश चांगला नव्हता का? २) मी प्रयत्नच करू नये का? ३) एक चिलट मेल्यामुळे आता दहा नवी चिलटे जन्म घेणार नाहीत हा लाॅंगटर्म फायदा नाही का? ४) माशी खोली बाहेर उडून गेली की नाही ? ५) माश्या लपतात त्या जागा कळल्या आता त्या जागांवर मी आणि माझे मित्र नजर ठेवू ६) शेजारचे लोक माश्या सोडायचे, पण आता ही माशी घाबरली असल्यामुळ त्या इकडे येणार नाहीत. ७) काच फुटली असे सांगणारे सर्वजण माशी, चिलट यांचे समर्थक आहेत. ८) ७० वर्ष कोणी काच का मजबूत केली नाही. ९) माशी मारण्याची हिंमत फक्त माझ्याकडेच आहे. मुलाचे कुटुंबिय आता मुलगा कसा कर्तृत्ववान आहे हे ढोल बडवून सांगत आहेत.

सूचना:
*याचा नोटबंदीशी काहीही संबंध जोडू नये*

No comments:

Post a Comment