Sunday, October 30, 2016

Story on tukaram mundhe

Forwarding from a whatsapp group, in marathi. Summary: tukaram mundhe, an honest young ips officer in vashi zilla, part of a generation of youth who have much higher-paying other prospects, but are entering governance/ups/ips on their passion to make their country a better place. Authored by a person who has seen his work up close.

तुकाराम मुंढे वाशिम जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना मी त्यांच्या सतत संपर्कात असायचो.एक तडफदार, तरुण अधिकारी म्हणून त्यांचा वाशिम जिल्ह्यात लौकीक होता (त्यांच्यावर वाशिम जिल्हा परिषदेत पेपर वेट फेकुन हल्ला सुद्धा झाला होता!). अशा अधिका-यांसोबत माझी चांगली केमिस्ट्री जमते कारण असे अधिकारी छुटपुट नेत्यांच्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लुटीच्या दुकानदा-या बंद पाडतात. प्रशासनात येणारी तुकाराम मुंढे सारखी आयपीएस पिढी नौकरी मिळवण्यासाठी प्रशासनात येत नाही तर "पॅशन" म्हणून येते आहे असं माझं निरिक्षण आहे. एक अतीषय तरुण आयपीएस अधिकारी मला म्हणतं होते, "बघं मी आयआयटीचा पासआऊट आहे, माझा मित्र मला म्हणतो की तू आता नोकरी सोड आणि माझ्या कंपनीत मला जाइन हो, तुला आता जितका पगार मिळतो त्या रकमेवर एक शुण्य वाढवून आपण सुरुवात करुयात, पण मला ते करायचं नाही आहे!" अशा आयपीएस अधिका-यांचं मनोबल वाढवलं तरच भारत विश्व पावर वगैरे बननार आहे अन्यथा काही फारसी होप दिसत नाही नाही. मुख्य मंत्र्यांनी तुकाराम मुंढेंवरचा अविश्वास प्रस्ताव नाकारुन एक चांगला संदेश दिला आहे. धन्यवाद फडणवीस साहेब.
निलेश हेडा

No comments:

Gift Economy

Would you like to show your appreciation for this work through a small contribution?
Contribute

(PS: there's no ads or revenue sources of any kind on this blog)

Related Posts with Thumbnails